
कोल्हापूर : जास्त भावातील कोकणी हापूस आंब्याच्या बॉक्समध्ये स्वस्त भावातील कर्नाटकी हापूस मिसळून विक्रीचा प्रकार यंदाही तेजीत आहे. दरवर्षी होणाऱ्या अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी देवगड हापूस आंबा बागायतदार असोसिएशनने बागातयदारांची नावे क्यूआर कोड सदृश्य स्टिकर्स लावण्याचा प्रयोग केला. तो कोल्हापूर बाजारात अयशस्वी झाल्याचे चित्र आहे.