esakal | इचलकरंजीत ग्राहकांची लूट; 1 लिटरच्या मापकातून दिले 750 मिली पेट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत ग्राहकांची लूट; 1 लिटरच्या मापकातून दिले 750 मिली पेट्रोल

इचलकरंजीत ग्राहकांची लूट; 1 लिटरच्या मापकातून दिले 750 मिली पेट्रोल

sakal_logo
By
ऋषिकेश राऊत

इचलकरंजी : पेट्रोल पंपावर (petrol) कमी पेट्रोल देवून ग्राहकांची लूट करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. जय हिंद मंडळ समोरील असलेल्या पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. संबंधित वाहनधारकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर उपस्थितांनी पेट्रोल पंपाला घेराव घातला आहे. (ichalkaranji) एक लिटरच्या मापकातून केवळ 750 मिली पेट्रोल वाहनधारकांना दिले जात आहे. ऐन पेट्रोल दरवाढीच्या काळात दिवसभर टेस्टिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट केल्याचा हा प्रकार घडल्याने नागरिक अधिकच संतापले आहेत. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिस (shivajinagar police) दाखल झाले आहेत. पेट्रोल देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: यंदा जादा पाऊस होणार असला, तरी महापूर राहणार नियंत्रणात!

जय हिंद मंडळ समोरील असलेल्या पेट्रोल पंपावर एक लिटर पेट्रोल 750 मिली मापकातून दिले जात होते. मात्र सकाळच्या सत्रात पेट्रोल पंप सुरू होण्यापूर्वी टेस्टिंगसाठी या मापकातून एकदाच वाहनधारकांना पेट्रोल दिले जाते. मात्र एक लिटरच्या मापकातून 750 मिली पेट्रोल देण्याचा हा प्रकार दिवसभर या पेट्रोल पंप सुरुच होता. गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एक वाहनधारक पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी आला. यावेळी त्याने एक लिटर मापकातून पेट्रोल देण्याची मागणी केली. मात्र मापकात एक लिटर ऐवजी 750 मिली पेट्रोल आढळून आले. त्यांनतर वाहनधारकाने याबाबत जाब विचारला. अनेकवेळा हा प्रकार अनुभवल्याचे वाहनधारकांनी पोलिसांना सांगितले. ऐन पेट्रोल दरवाढीच्या काळात हा प्रकार घडल्याने वाहनधारक चांगलेच संतापले होते.

loading image