esakal | यंदा जादा पाऊस होणार असला, तरी महापूर राहणार नियंत्रणात!
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा जादा पाऊस होणार असला, तरी महापूर राहणार नियंत्रणात!

यंदा जादा पाऊस होणार असला, तरी महापूर राहणार नियंत्रणात!

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : यंदा जादा पाऊस होणार (heavy rain) असला, तरीही महापूर (kolhpaur flood sistuation) येणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. त्याचा परिणाम जूनमध्ये दिसून आला. गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या पावसापेक्षा या वेळी तो अधिक झाला. यंदा जूनमध्ये १०९ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. कर्नाटकाशी (karnatak) समन्वय आणि पावसाचे प्रमाण, अंदाज घेऊनच धरणांतील पाण्याचा विसर्ग झाला. २५ जुलैनंतर धरणांतील विसर्ग बंद केला जाईल. नियोजनातूनच महापुरावर नियंत्रण आणण्याचा यशस्वी प्रयोग होत आहे.

पाऊस अधिक झाला तर महापूर होतो आणि त्यानंतर हाहाकारातून होणारे नुकसान परवडणारे नसते. २००५ आणि २०१९ चा हा अनुभव कोल्हापूरकरांनी घेतला आहे. त्यानंतर मात्र अनेक तांत्रिक बाजू पुढे आल्या आणि धरणांतील साठाच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २५ जुलैनंतर करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून झाला. गत वर्षापर्यंत धरण भरत नाही, तोपर्यंत विसर्ग होत नव्हता. एकदा धरण भरले, की पुन्हा साठा कमी होणार नाही, याची दक्षता घेतली जात होती. सप्टेंबरअखेरपर्यंत धरण भरले नाही, तर पुढे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणेच हवामान आणि पावसाचा अंदाज वर्तविणाऱ्या वेगवेगळ्या विभागांतून नियंत्रण ठेवण्याचा निर्णय झाला.

हेही वाचा: लालपरीचा प्रवास आता कमी खर्चात; एसटी धावणार वीज आणि गॅसवर

परिणामी, धरण भरण्यापूर्वीच पावसाचे प्रमाण वाढले, तर त्याचा विसर्ग सुरू होतो आणि त्यातून वीजनिर्मितीला पाणी सोडले जाते. याही वर्षी राज्यात ११० टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागासह इतर अभ्यासकांनी वर्तविला आहे. त्यानुसार जूनमध्ये सरासरी ३९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी हा पाऊस ३२७ मिलिमीटर झाला होता. या वेळी १९० टक्के पाऊस झाला आहे.

महापूर नियंत्रणासाठी...

  • धरणातील विसर्ग योग्य ठेवणे

  • २५ जुलैनंतरच धरणांत साठा करणे

  • २५ जुलैनंतर केवळ नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस

  • कर्नाटकातील समन्वयाने पाण्याचा विसर्ग

यंदाच्या जूनमधील अनुभव

  • राधानगरी धरणातून रोज १२०० क्युसेक विसर्ग

  • जूनमध्ये गतवर्षीपेक्षा जादा पाऊस

  • राजाराम बंधारा दोन वेळा पाण्याखाली

  • पंचगंगा पाणी एकदा पात्राबाहेर

हेही वाचा: दिलासादायक; कोल्हापुरात कोरोनाची साथ येतेय नियंत्रणात

"गेल्या वीस वर्षांतील पाऊस, धरणांतील विसर्ग, पाणीसाठा आणि पाणलोट क्षेत्रातील पाऊस यांचा दररोजचा अभ्यास केला आहे. त्यानुसार जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्टच्या पंधरवड्यातील पावसाने राधानगरी धरण भरते. त्यानुसार पाणीसाठा कमी केला आहे. अधिक पाऊस असेल तेव्हा धरणाचे पाणी सोडले जाणार नाही. तसेच अलमट्टी आणि कर्नाटकातील विसर्गाचाही समन्वयामुळेच महापूर नियंत्रणात राहण्याची खात्री आहे."

- रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता, जलसिंचन विभाग.

loading image