सरकारी रुग्‍णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना म्युकरचे इंजेक्‍शन मोफत

खासगी रुग्‍णालयात उपचार करणाऱ्या रुग्‍णांना ही इंजेक्‍शन विकत घ्यावी लागत आहेत
सरकारी रुग्‍णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना म्युकरचे इंजेक्‍शन मोफत

कोल्‍हापूर : जिल्‍ह्यात म्युकर मायकोसिसचे आतापर्यंत १३८ रुग्‍ण सापडले आहेत. या आजारावर ॲम्‍फोटेरीसिन - बी हे इंजेक्‍शन उपयुक्‍त ठरत आहे. मात्र, या इंजेक्‍शनची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने शासनाने महात्‍मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत या आजारांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. तर खासगी रुग्‍णालयात उपचार करणाऱ्या रुग्‍णांना ही इंजेक्‍शन विकत घ्यावी लागत आहेत. आतापर्यंत १२९९ इंजेक्‍शन ही खासगी रुग्‍णालयांसाठी दिली आहेत. या इंजेक्‍शन विक्रीतून ६३ लाख १५ हजार ८५८ रक्‍कम आरोग्य विभागाच्या खात्यावर जमा झाली आहेत. ही रक्‍कम शासनाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

शासकीय रुग्‍णालयात उपचार घेणाऱ्या रुग्‍णांना आतापर्यंत २९६१ इंजेक्‍शन दिली आहेत. मात्र, या इंजेक्‍नशनसाठी झालेला दीड कोटीचा खर्च शासनाने उचलला आहे. कोरोना रुग्‍णांमध्ये म्‍युकर मायकोसिस अर्थात काळ्या बुरशीचा आजार फैलावत आहे. साथीच्या रोगांत या आजाराचा समावेश केला आहे. काळ्या बुरशीच्या आजारात रुग्‍णाच्या डोळे आणि नाकाला बाधा होत आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी मोठा खर्च येत आहे. त्यामुळेच शासनाने या काळ्या बुरशीचा आजार झालेल्या लोकांना मोफत उपचार केले जात आहेत.

सरकारी रुग्‍णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना म्युकरचे इंजेक्‍शन मोफत
सांगली डॉट कॉम; महापालिका प्रशासन आरोपांच्या पिंजऱ्यात

महात्‍मा फुले जनआरोग्य योजनेतून हा खर्च केला जात आहे. या आजारावर ॲम्‍फोटेरीसिन बी हे इंजेक्‍शन प्रभावी ठरत आहे. मात्र, अचानक रुग्‍णसंख्या वाढल्याने या इंजेक्‍शनची मागणी वाढली आहे. त्यामुळे त्याचा तुटवडाही जाणवत आहे. कोरोना प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिव्हिरचा काळा बाजार होऊ लागल्याने शासनाने म्युकर मायकोसिससाठी आवश्यक इंजेक्‍शनचा पुरवठा सरकारी यंत्रणेकडेच ठेवला आहे.

गोरगरिबांचा दीड कोटीचा खर्च वाचला

जिल्‍ह्यात म्‍युकर मायकोसिसचे १३८ रुग्‍ण सापडले आहेत. यातील १२ रुग्‍णांचा मृत्यू झाला असून, ६० रुग्‍ण खासगी, तर ७८ रुग्‍ण हे शासकीय रुग्‍णालयात उपचार घेत आहेत. सरकारी रुग्‍णालयात उपचार घेणाऱ्या रुग्‍णांना मोफत इंजेक्‍शन दिली जात आहेत. एका इंजेक्‍शनसाठी किमान ५ ते ६ हजार रुपये खर्च येत आहे. मात्र, शासन मोफत इंजेक्‍शन देत असल्याने गोरगरिबांचा सुमारे दीड कोटींचा खर्च वाचला आहे.

सरकारी रुग्‍णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना म्युकरचे इंजेक्‍शन मोफत
ग्रँडफादर ट्री; वडाच्या झाडाचे आयुष्य शेकडो वर्ष असण्याचं कारण माहितीय का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com