कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासींचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान : एक आढावा

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसासह जिल्ह्यातील आदिवासीना न्याय द्यावा ही आर्त
कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासींचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान : एक आढावा

आज संबंध भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपल्या प्राणाची आहुती देशभरातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांना प्रथम वंदन करतो. देशाच्या  स्वातंत्र्य लढयात समाजातील त्रस्त घटकां बरोबरच अग्रभागी राहिला तो या देशाचा मूलनिवासी भूमिपुत्र अर्थात आदिवासी बांधव ..

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, करवीर, राधानगरी, हातकणंगले, शिरोळ , आदि तालुक्यातील आदिवासी बांधवांनी १९३० चा जंगल सत्याग्रह , १९४१ चा वैयक्तिक सत्याग्रह ,  १९४२ चे चलेजाव आंदोलन व तदनंतरच्या काळात शासकीय कचेऱ्या जाळणे , रेल्वे रूळ उखडणे ,सरकारी खजिना लुटणे अशा विविध आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवुन तर कधी भूमिगत राहून प्रसंगी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेऊन तुरुंगवास , स्थानबद्धता , सक्षम कारावास , सक्त मजुरी , आदी शिक्षा भोगल्या व मायभूमीला ब्रिटिशांच्या जुलमी व अन्यायकारी राजवटीतन मुक्त केले . चंदगड तालुक्यातील मौजे चिंचणे , कामेवाडी , तळगुळी या दुर्गम डोंगराळ भागातील जल , जंगल व जमीन यांचे परकीयांपासून संवर्धन करण्यासाठी सहभाग नोंदवला. या जेष्ठ स्वातंत्र्य सेनानीच्या कार्याचा संक्षिप्त आढावा खालील प्रमाणे...

१) कुरणे बाबूराव जिवाणा - तळगुळी , ता चंदगड  

कार्य : १९४० -१९४१ च्या वैयक्तिक सत्याग्रह ,१९४२ च्या चळवळीत सहभाग 

शिक्षा : ३ महिने सक्षम कारावास 

२) गुरव ताना मशाप्पा - चिंचणे, ता चंदगड 

कार्य : १९४२ च्या चळवळीत सहभाग 

शिक्षा : ३ महिने स्थानबद्ध 

३) गुरव नाना मशाप्पा - चिंचणे ,ता चंदगड 

कार्य : १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून सहभाग 

शिक्षा : ३ महिने कैद 

४) गुरव लक्ष्मीबाई शंकर : चिंचणे ,ता चंदगड 

कार्य : १९४४ साली सत्याग्रह केला . 

शिक्षा : १ महिना कैद

५) गुरव शंकर नाना : चिंचणे ,ता चंदगड 

कार्य : १९४१ च्या वैयक्तिक सत्याग्रह ,१९४२ च्या चळवळीत सहभाग 

शिक्षा : ४ महिने सक्त मजुरी 

६) चिगरी बसवंत सुबराव : चिंचणे ,ता चंदगड 

कार्य : १९४२ च्या चलेजाव  चळवळीत सहभाग 

शिक्षा :  १ वर्ष व ९ महिने सक्षम कारावास .

७) नाईक बसवंत नागप्पा : कामेवाडी , ता चंदगड 

कार्य : १९४१ च्या वैयक्तिक सत्याग्रह ,१९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून सहभाग . 

शिक्षा : ४ महिने साधी कैद 

८) पाटील आप्पया इराप्पा : कामेवाडी , ता चंदगड 

कार्य : १९३०च्या जंगल सत्याग्रह मध्ये सहभाग 

शिक्षा : ६ महिने सक्षम कारावास

९) पाटील उमान्ना मेनाप्पा - कामेवाडी , ता चंदगड 

कार्य : १९४२ च्या चलेजाव  चळवळीत भूमिगत राहून  सहभाग 

शिक्षा :  १९४५ साली खटला चालवला , ९ महिने सक्षम कारावास व सक्त मजुरी.

१०) पाटील बसवंत लक्ष्मण - चिंचणे ,ता चंदगड 

कार्य : १९४२ च्या चलेजाव  चळवळीत भूमिगताना आश्रय देऊन  सहभाग . 

शिक्षा :  ३ महिने सक्षम कारावास 

११) पाटील खेमाजी हुवाणा - कामेवाडी , ता चंदगड 

कार्य : १९४२ च्या चलेजाव चळवळीत भूमिगत राहून  सहभाग 

शिक्षा : ९ महिने सक्षम कारावास.

१२) पाटील भरमान्ना ओमन्ना : चिंचणे ,ता चंदगड 

कार्य : १९४२ च्या चलेजाव  चळवळीत सहभाग .

शिक्षा : सव्वा वर्षे अंडर ट्रायल , १५ दिवसाची सक्तमजुरी  

१३) पाटील यल्लाप्पा परशुराम :  कामेवाडी , ता चंदगड 

कार्य :वैयक्तिक सत्याग्रह सहभागी ,  १९४२ च्या चलेजाव  चळवळीत भूमिगत राहून  सहभाग 

शिक्षा : ४ महिने सक्षम कारावास.

१४ ) गुरव रामचंद्र नाना : चिंचणे ,ता चंदगड 

कार्य : १९४२ च्या चलेजाव  चळवळीत भूमिगत राहून    सहभाग . 

शिक्षा :  ३ महिने सक्षम कारावास .

चंदगड तालुक्यातील वरील १४ स्वातंत्र्य सैनिक हे आदिवासी महादेव कोळी जमातीचे होते . यांचा उपद्रव सातत्याने ब्रिटिश प्रशासनाला सहन करावा लागला . आंदोलन काळात स्वातंत्र्य सेनानीनी मौजे चिंचणे येथील गाव चावडी व प्राथमिक शाळेतील दस्तऐवज जाळले याचे पुरावे आज सुद्धा शाळेच्या मूळ जनरल रजिस्टरला पहावयास मिळतात . ब्रिटिशांना उपद्रव मूल्य राहिलेल्या आदिवासीना त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी १७ जानेवारी ,१९४८ रोजी तत्कालीन मुंबई सरकारने , "दि जंगलधंदे कामकरी उत्पादक संघ लि . चिंचणे - कामेवाडी , या संघाची स्थापना केली . हा संघ १९७६ साली अवसायनात काढला मात्र १९९३पर्यंत या संस्थेशी शासकीय पत्रव्यवहार सुरू असल्याचे समजते

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपल्या पूर्वजांच्या कार्याचा अमिठ ठसा सदैव स्मरणात रहावा या करिता ग्रामपंचायत चिंचणे व आदिवासीसंघर्ष समिती , महाराष्ट्र राज्य या दोहोनी पंचायत समिती चंदगड समोरील स्मृतिस्तंभाच्या धर्तीवर मौजे चिंचणे , ग्रामपंचायती समोर " आदिवासी स्वातंत्र्य सेनानी स्मृति स्तंभ " उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडे केली आहे .

 तसेच , स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आदिवासीच्या न्याय हक्काची राजकर्त्यांकडून व प्रशासनाकडून होत असलेली परवड तात्काळ थांबवावी व जेष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसासह जिल्ह्यातील आदिवासीना न्याय द्यावा ही आर्त विनवणी या प्रसंगी स्वकियांकडे करत आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com