
कोल्हापूर : शहरातील रस्ते कसे आदर्श असावेत यासाठी कळंबा साई मंदिर ते सुर्वेनगर दरम्यानचा एक किमीचा रस्ता मॉडेल रोड म्हणून केला. दोन वर्षे या रस्त्याचे काम सुरू होते. अद्ययावत पद्धतीने डांबरी रस्ता, प्रशस्त फूटपाथ, कारपार्किंग स्लॉट, झाडे लावण्यासाठी आकर्षक जागा केल्या आहेत. साईमंदिरापासून शहराबाहेर जाणारे वाहनधारक चकचकीत डांबरी रस्ता आला म्हणून जरा वेगाने वाहन चालवतात.