Sakhubai jankar
sakal
कोल्हापूर - कडक उन्हाचा तडाखा, डोक्यावर काळ्याभोर करवंदांनी भरलेली बुट्टी सांभाळत, भवानी मंडपात नजरेस पडते ती, करवंदे विकणारी शाहूवाडी तालुक्यातील अणुस्कुरा येथील सखुबाई साखरू जानकर. वयाच्या सत्तरीतही तब्बल ७५ किलोमीटरचा खडतर प्रवास करून हा डोंगरचा रानमेवा शहरात आणतात. फक्त दोन घासांसाठी अन् परंपरा टिकविण्यासाठी त्यांची ही धडपड.