esakal | गडहिंग्लज-हलकर्णीत इलेक्‍ट्रॉनिक्‍स हब शक्‍य : नेत्यांची मानसिकता महत्त्वाची
sakal

बोलून बातमी शोधा

Gadhinglaj Halkarni Electronics hub power kolhapur marathi news

कोल्हापुरात टीव्ही (दूरचित्रवाणी संच) तयार होत होता. त्यानंतर सुटे भाग मिळत राहिले आणि पुढे ते जोडून टीव्ही बनविण्याचे काम सुरू झाले

गडहिंग्लज-हलकर्णीत इलेक्‍ट्रॉनिक्‍स हब शक्‍य : नेत्यांची मानसिकता महत्त्वाची

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : इलेक्‍ट्रॉनिक हबची चर्चा गतवर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात झाली होती. त्यानंतर येथे हब होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही. येथे हब झाल्यास बेरोजगारांना उद्योग मिळेल आणि कोल्हापूरच्या प्रगतीचा हा एक टप्पा ठरू शकतो, असा विश्‍वास उद्योजकांना आहे. गतवर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इलेक्‍ट्रॉनिक हबसाठी प्रोत्साहन योजना सुरू केली होती. मात्र, जागेचा प्रश्‍न उपस्थित झाला होता, आता प्रत्यक्षात गडहिंग्लज-हलकर्णी औद्योगिक वसाहतीत हे शक्‍य आहे.

मॉडर्न इलेक्‍ट्रॉनिक मॅन्युफॅक्‍चरिंग क्‍लस्टरर्स (इएमसी २.०) या योजनेतून प्रत्येक राज्यात इलेक्‍ट्रॅनिक्‍स हब करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्यासाठी ३ हजार ७ ६२.२५ कोटी निध होता. कोल्हापुरात हब होण्यासाठी सुमारे पाचशे एकर जागेची आवश्‍यकता होती. मात्र, प्रमुख तीन औद्योगिक वसाहतीत जागाच उपलब्ध नसल्याने दुर्लक्ष झाले.

इलेक्‍ट्रीक गाड्याही तयार करण्याची कोल्हापुरात क्षमता
कोल्हापूर उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. याचचाच भाग म्हणून इलेक्‍ट्रॉनिक्‍सकडे पाहिले जाते. कोल्हापुरात टीव्ही (दूरचित्रवाणी संच) तयार होत होता. त्यानंतर सुटे भाग मिळत राहिले आणि पुढे ते जोडून टीव्ही बनविण्याचे काम सुरू झाले. कालांतराने हाच येथील मुख्य व्यवसाय बनला. सर्व कच्चा माल एकाच ठिकाणी मिळाला तर कोल्हापुरात एलईडीच नव्हे तर इलेक्‍ट्रीक (बॅटरीवरील) दुचाकी, चारचाकीही तयार करण्याची क्षमता असल्याचे उद्योजक सांगतात.

हेही वाचा- महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळला; महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक

‘इलेक्‍ट्रॉनिक हब’बाबत आमच्याकडे शासकीय यंत्रणेतून काहीच मिळालेले नाही. मात्र, हब उभारण्यासाठी एमआयडीसीकडून गडहिंग्लज-हलकर्णी येथे जागा उपलब्ध होऊ शकते. एमआयडीसीकडून नेहमीच उद्योजकांना प्रोत्साहीत केले जाते.
- धनंजय इंगळे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

इलेक्‍ट्रॉनिक्‍स हब उभारल्यास अनेकांना उद्योग मिळेल, बेरोजगारी कमी होईल. शासकीय पातळीवर प्रयत्न अपुरे ठरले. कोल्हापूरच्या मातीत असलेल्या कौशल्याचा उपयोग करून देश-विदेशातील बाजारपेठेला चॅलेंज करता येईल. केवळ नेत्यांची मानसिकता आवश्‍यक आहे.
- अनिल धडाम, अध्यक्ष, इलेक्‍ट्रॉनिक्‍स असोसिएशन

हेही वाचा- इंधन, खतांचे दर गगनाला; शेतीमाल मात्र कवडीमोल

संपादन- अर्चना बनगे