
गडहिंग्लज : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या सौद्यामध्ये जवारी मिरचीने (संकेश्वरी) दराचा नवा उच्चांक नोंदविला. आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक १७१० रुपये प्रतिकिलो असा या मिरचीला दर मिळाल्याने ग्राहकांना यंदा ही मिरची झोंबणार आहे. २०१९ मध्ये या मिरचीला १६१० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला होता. त्यावेळच्या या दराचा उच्चांक यंदा मोडला आहे.