गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदी वाहिली उलट्या दिशेने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 हिरण्यकेशी नदीवरील गोटूर बंधाऱ्याजवळ

गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदी वाहिली उलट्या दिशेने

गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदीवरील गोटूर बंधाऱ्याजवळ शनिवारी (ता. १८) सायंकाळी आश्‍चर्यकारक घटना पाहायला मिळाली. कर्नाटकातील मुसळधार पावसाने ओढ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात हिरण्यकेशी नदीत आले, पण हे पाणी पूर्वेला कर्नाटकात जाण्याऐवजी उलट्या दिशेनेच पश्‍चिमेकडे (राष्ट्रीय महामार्गाकडे) वाहू लागले. नागरिकांनी बंधाऱ्याजवळ गर्दी केली होती.

हिरण्यकेशी नदी पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहते. शनिवारी सायंकाळी कर्नाटकातील निडसोशी, कमतनूर, गोटूर व पंचक्रोशीत ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाला.यामुळे या भागातील ‘कापूर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले. हा ओढा हिरण्यकेशी नदीवरील गोटूर बंधाऱ्याच्या पूर्वेला (कडलगेच्या दिशेला) नदीपात्रात येऊन मिळाला आहे. ओढ्याचे हे पाणी नदीपात्रात आले; मात्र ते पूर्वेला जाण्याऐवजी पश्‍चिमेला वाहत होते. नव्या बंधाऱ्यातून राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने हे पाणी प्रवाहित झाले. महामार्गावरील पुलापर्यंत हे पाणी पोहचले. नांगनूरच्या जॅकवेलजवळचे पात्रही या पाण्याने भरले. प्रत्येकजण हा आश्‍चर्यकारक क्षण मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच या घटनेचे आश्‍चर्यही व्यक्त करण्यात येत होते.

१५ वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती

१५ वर्षांपूर्वीही अशाच प्रकारे मुसळधार पावसाने ओढ्याचे पाणी नदीपात्रात आल्यानंतर ते पश्‍चिमेकडे वाहत असल्याचे नांगनूर परिसरातील काही नागरिकांनी सांगितले. ओढ्याचे पाणी ज्याठिकाणी नदीला मिळते, तेथून पश्‍चिमेच्या दिशेने काहीसा उतार असल्याचेही सांगण्यात आले. यामुळे ओढ्यातून वेगाने येणारे पाणी पश्‍चिमेकडे आल्याचा अंदाज बांधला जात आहे.

Web Title: Gadhinglaj River Hiranyakeshi Flows Opposite Direction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top