Gadhinglaj Road Accident: पत्नीचे अपघाती निधन, दोन महिन्यांत पतीचाही अपघातात मृत्यू, वर्षभरात कुटुंबातले पाच जण गमावल

Patil Family Loses Five Members Within a Year: दोन महिन्यांपूर्वी पत्नी सरिता यांचेही अपघाती निधन झाले होते. मागील वर्षभरात पाटील कुटुंबातील पाच जण गमावल्याने हरळी खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Gadhinglaj Road Accident

Gadhinglaj Road Accident

esakal

Updated on

महागाव: दोन महिन्यांपूर्वी पत्नीचे अपघाती निधन झाले. त्यातून अद्याप सावरले नसतानाच आज पतीचाही अपघाती मृत्यू झाला. तानाजी बापू पाटील (वय ४५, रा. हरळी खुर्द, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे. गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावर हरळी खुर्द (ता. गडहिंग्लज) येथे त्यांना मोटारीने पाठीमागून धडक दिली. दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. पती-पत्नीच्या अपघाती निधनाच्या दुर्दैवी घटनेने हरळीकर हळहळले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com