Gadhinglaj water pipeline burst news
esakal
गडहिंग्लज (कोल्हापूर) : गारगोटी-चंदगड राज्यमार्गातील गडहिंग्लज ते भडगाव पुलापर्यंत रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. पालिकेने वेळोवेळी सूचना देऊनही ठेकेदाराने पुन्हा एकदा जलवाहिनी (Gadhinglaj water pipeline burst news) फोडली. अचानक पाणी मिळेनासे झाल्याने भडगाव रोड परिसरातील सातशेहून अधिक कुटुंबांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, ठेकेदार पाण्याबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप करत ठेकेदाराच्या निषेधार्थ पालिकेचे पदाधिकारी आज रस्त्यावर उतरले. पाणी मिळत नाही तोपर्यंत कामही बंद पाडले.