तपासणीतून २०१३ ते २०२५ मार्चअखेर तालुक्यातील ८२५ विद्यार्थी हृदयाशी संबंधित आजाराने ग्रासल्याचे समोर आले. त्यांची इको तपासणी केली. त्यामध्ये पन्नास टक्के विद्यार्थ्यांची इको तपासणी नॉर्मल आली. काही विद्यार्थ्यांना औषधोपचार सुरू आहेत. दोनशेभर विद्यार्थ्यांची वारंवार तपासणी केली जात आहे.
Joy restored: Children from Gadhinglaj Taluka treated successfully under the Bal Swasthya Yojana for heart ailments.Sakal
गडहिंग्लज : शासनाची एखादी योजना गरिबांना किती लाभदायी ठरते, याचे उत्तम उदाहरण राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम होय. लहानपणीच मुलांचे आजार शोधून त्यावर मोफत उपचार आणि गरज लागली तर शस्त्रक्रिया करण्याचा हा कार्यक्रम.