
गांधीनगर : येथे विठ्ठल सुभाष शिंदे या तरुणाच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या पाच संशयितांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, दोन अल्पवयीनांना न्यायालयाच्या सूचनेनुसार बालसुधारगृहात दाखल करण्यात आले.