
गांधीनगर : कॉस्मेटिक साहित्य खरेदीच्या बहाण्याने गांधीनगर मुख्य रस्त्यावरील एका कटलरीच्या दुकानात साहित्याची चोरी करताना अमित विजय कवेकर (वय ५०, रा. पोपळे गल्ली, गारगोटी, जि. कोल्हापूर) या चोरट्याला गांधीनगर पोलिसांनी दुकानातच अटक केली. ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. त्याच्याकडून चार हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबतची फिर्याद मनोज छेतराराम चौधरी (रा. गांधीनगर) यांनी दिली.