Kolhapur Crime News
esakal
कोल्हापूर : गणेशोत्सवामध्ये (Ganeshotsav) हिरीरिने सहभागी झालेल्या करण कृष्णात गायकवाड (वय १४, रा. चाफोडी, ता. राधानगरी) याने काल सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आई, वडील शेतीच्या कामासाठी गेल्याने घरी कोणीच नव्हते. मागील दहा दिवसांपासून त्याचा गणेश मंडळामध्ये वावर होता. त्याच्या चटका लावणाऱ्या मृत्यूने कुटुंबीयांसह ग्रामस्थांना धक्का बसला.