-गौरव डोंगरे
कोल्हापूर : कोणी हमाली करतोय... कोणाचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान.... कोणावर घरची जबाबदारी असल्याने पैशांची तंगी... चार महिन्यांपूर्वीच गांजा (Marijuana Sales) विकण्याची एक ‘ट्रिप’ केल्याने दोघांना बक्कळ पैसा मिळाला. आत्मविश्वास वाढल्याने पुन्हा गोव्यात पुरवठ्याचा निर्णय घेतला. ‘पोलिस दुचाकी तपासत नाहीत’ असा समज करून गोव्याकडे मार्गस्थ झालेल्या सोहेलला पकडून रॅकेट उघडकीस आणत कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ९१ किलो गांजा जप्त केला. राज्यभर परसलेले रॅकेट यातून समोर आणण्याची संधी पोलिसांकडे (Kolhapur Police) आहे.