Video - ना ढोल, ना ताशा कोल्हापूरातील प्रथम मानाच्या गणेशाचे सोशल डिस्टंन्स ठेवत विसर्जन 

ganpati Immersion procession in Kolhapur Immersion of Ganesh idol of Tukaram Mali Talim Mandal the first Ganapati
ganpati Immersion procession in Kolhapur Immersion of Ganesh idol of Tukaram Mali Talim Mandal the first Ganapati
Updated on

कोल्हापूर : प्रथम मानाचा गणपती असणाऱ्या तुकाराम माळी तलीम मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन आज कुंडामध्ये करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी होणारी मिरवणूक, मान्यवरांची गर्दी आणि वाद्यांचा गजर यांना फाटा देऊन साध्यापद्धतीने विसर्जन सोहळा पार पडला. यावेळी महापौर, आयुक्त यांची प्रमूख उपस्थिती होती. 


कोल्हापुरातील विसर्जन मिरवणूक हा राज्यामध्ये उत्सुकतेचा विषय असतो. मंडळांचे चित्ररथ, तरुणाईचा जल्लोष, पारंपरिक वाद्याचा कडकडाट यामुळे अनंतचर्तुदशीचा दिवस नेहमीच स्मरणीय बनतो. विसर्जन मिरवणुकीची औपचारीक सुरुवात ही तुकाराम तालीम मंडळाच्या गणेश पूजन आणि पालखी सोहळ्याने होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीमध्ये या मानाच्या गणेश मूर्तीची आरती होते. दिमाखदार पालखी सोहळ्याने गणेश विर्सजन मिरवणुकीला प्रारंभ होतो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व मंडळानी स्थानिक ठिकाणीच विसर्जन करावे असे आवाहन प्रशासनाने केले होते. याला प्रतिसाद देत तुकाराम तालीम मंडळाच्या गणेश मूर्तीचेही विसर्जन येथील साठीमारी चौकात ठेवलेल्या कुंडामध्ये करण्यात आले. 


तालमीचे सर्व कार्यकर्ते सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तलमीसमोर एकत्र आले. यावेळी त्यांनी फुलांनी सजवलेलेल्या पालखीमध्ये श्रींची मूर्ती ठेवली. त्यानंतर महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून पालखी साठमारी चौकात आणण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पा मोरयाचा गजर केला. विसर्जन कुंडाजवळ आरती करून मूर्तीचे कुंडामध्ये विसर्जन करण्यात आले. यावेळी महापालिका विरोधी पक्ष नेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक संभाजी जाधव, तालमीचे अध्यक्ष शिवाजी पोवार, माजी नगरसेवक आनंदराव पायमल, राजाराम शिंदे, एकनाथ टिपुगडे, किरण अतिग्रे, चंद्रकांत देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

दरवर्षी वाजतगाजत तुकाराम माळी तालमीच्या गणेश मूर्तीची मिरवणूक निघते. परिसरातील सर्व नागरिक मोठ्या उत्साहात यामध्ये सहभागी होतात. यंदा मात्र कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मोजक्‍या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्येच कुंडामध्ये विसर्जन करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंन्सिंग ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. 
- शिवाजी पोवार (अध्यक्ष, तुकारम माळी तालीम मंडळ)  

संपादन -  अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com