esakal | वडणगेत कचऱ्या‍चा प्रश्‍न गंभीर; ढीगाऱ्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

वडणगेत कचऱ्या‍चा प्रश्‍न गंभीर; ढीगाऱ्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त

वडणगेत कचऱ्या‍चा प्रश्‍न गंभीर; ढीगाऱ्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त

sakal_logo
By
सुनील स. पाटील

वडणगे : येथील कचऱ्या‍चा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. कचरा टाकायला जागाच नसल्याने गावात ठिकठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडला आहे. ग्रामपंचायतीने या कचऱ्या‍ची विल्हेवाट लावण्यासाठी पावले उचलावीत, अशी ग्रामस्थांमधून मागणी होत आहे. सुमारे १९ हजार लोकसंख्या असलेल्या या गावचा काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. रहिवासी संख्या वाढल्याने नागरी समस्याही निर्माण होत आहेत.

गावात दररोज दोन ते तीन टन कचरा साचतो. एका घंटागाडीतून हा कचरा गोळा करून तो गावातील पडक्या विहिरीत टाकला जातो. मात्र, काही विहीरमालक कचरा टाकण्यास विरोध करत असल्याने गोळा केलेला कचरा टाकायचा कोठे, असा प्रश्‍न ग्रामपंचायतीसमोर आहे. जागाच नसल्याने सध्या ग्रामपंचायतीकडून कचरा गोळा करणेही बंद झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ रिकाम्या जागेत कचरा टाकत असल्याने जागोजागी कचरा दिसत आहे. गावात प्रवेश होणाऱ्या‍ कागद कारखाना परिसरात रस्त्याकडेला कचऱ्या‍चा मोठा ढीग आहे. हा कचरा हळूहळू रस्त्यावर येत असून, ग्रामस्थांना दुर्गंधीचा सामना करतच गावात प्रवेश करावा लागत आहे.

हेही वाचा: नोकरीच्या अमिषाने तब्बल 18 लाखांची फसवणूक; एकास अटक

"गावातील काही पडीक विहिरींत कचरा टाकू दिला जात नाही. त्यामुळे कचरा टाकण्यासाठी जागेची समस्या आहे. धनकचरा प्रकल्प राबवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहे. हा प्रकल्प सुरू होईपर्यंत आणि जागा मिळेपर्यंत पडीक विहिरींच्या मालकांनी कचरा टाकण्यासाठी सहकार्य करावे."

- सचिन चौगले, सरपंच

loading image
go to top