esakal | नोकरीच्या अमिषाने तब्बल 18 लाखांची फसवणूक; एकास अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

सोने तारणवर जास्त परतावा मिळवून देतो असे सांगून वेगवेगळ्या बँकात सोने ठेवायला सांगितले.

नोकरीच्या अमिषाने तब्बल 18 लाखांची फसवणूक; एकास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नोकरी लावतो, सोने तारणवर चांगला परतावा देतो, असे सांगून चौघांची लाखो रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार फेब्रुवारी २०२० मध्ये घडला. यातील संशयीत आरोपी मिर सरफराज अली (वय ४८, रा. हैदराबाद, तेलंगणा) याला आज पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. चौघांची १८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची माहिती त्याने तपास अधिकाऱ्यांनी दिली. पूनम संजय अतिग्रे (वय ४७, रा.मंगळवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिर सरफराज अली याची अतिग्रे यांच्याशी ओळख झाली. तुमच्या मुलाला नोकरी लावतो असे सांगून अतिग्रे यांच्याकडून १४ लाख ५१ हजार रुपये घेतले. सोने तारणवर जास्त परतावा मिळवून देतो असे सांगून वेगवेगळ्या बँकात सोने ठेवायला सांगितले. सोने तारणवर मिळालेली रक्कमही मिर सरफराज अली यानेच घेतली असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. नोकरी लावण्याच्या बहाण्याने सुधीर कानडे, रामचंद्र म्हैतर यांच्याकडूनही प्रत्येकी १ लाख रुपये घेतले. मोहन चाचे यांच्याकडून १ लाख ३० हजार ५०० रुपये, विशाल संकपाळ यांच्याकडून ७० हजार रुपये घेतले. मात्र कोणालाही नोकरी न लावता मिर सरफराज अली एके दिवशी बेपत्ता झाला. त्यानंतर अतिग्रे यांनी जूना राजवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली.

हेही वाचा: एका रात्रीत मच्छीमार लखपती; जाळ्यात सापडली 'घोळ' मासळी

दुबईतील गोल्ड लायन्स...

आपण दुबईमध्ये सोन्याचा व्यापार करतो. आपल्याकडे तेथील गोल्ड लायस्न आहे. मात्र कोरोनामुळे तिकडे जाता येत नाही. त्यामुळे इथूनच व्यापार करतो. असे मिर सरफराज अली याने सर्वांना सांगितले होते. त्यावर विश्वास ठेऊन काही जणांनी सोनेतारण केले.

मोबाईल ट्रेसवरूव शोधले

फिर्याद दाखल झाल्यापासून मिर सरफराज अली हा बेपत्ता होता. ९ महिन्यांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याच्या विरोधात अटक वॉरंट काढले. त्याचा मोबाईल ट्रेस केल्यावर तो हैदराबार येथे असल्याचे समजले. एका लॉजवरून त्याला ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात विश्वजित कदमांची घुसखोरी?

loading image
go to top