जरबेरा फुलाचा दर एक रुपया झाल्यामुळे फुले काढण्याचा खर्चही भागत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक शेतकरी फुले काढून टाकत आहेत.
कुडित्रे : प्रदूषणात भर घालणाऱ्या चायना प्लास्टिक फुलांमुळे (China Plastic Flowers) हरितगृहातील फूल शेती आर्थिक अडचणीत सापडली आहे. जरबेराच्या एका फुलाचा (Gerbera Flower) उत्पादन खर्च दोन रुपये असताना दर मात्र एक रुपया मिळत आहे. यामुळे आधुनिक शेती करणारे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.