
Native cows : देशात स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशी गायींची संख्या घटत आली आहे. देशभरात एकूण ३६० हून अधिक देशी गायींच्या जाती असताना काही जातींमधील देशी पशुधन दुर्मीळ झाले आहे. या देशी गायींच्या परिपोषणासाठी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र शासनाच्या वतीने प्रतिदिन अनुदान योजना जानेवारीमध्ये सुरू झाली. यातून जिल्ह्यातील ८७६ देशी पशुधनांना आतापर्यंत ४० लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. यामुळे देशी गायींच्या संगोपनाला चालना मिळाली आहे. दरम्यान, वैयक्तिक देशी संगोपनाला गती मिळण्यासाठी प्रत्येक देशी पशुधनाला अनुदान मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे.