कागल : भरधाव वेगात चाललेल्या मोटारीने दुचाकीला पाठीमागून जोरात ठोकरल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील १३ वर्षांची मुलगी जागीच ठार झाली. तर तिचा मामा गंभीर जखमी झाला. गौरी महेश नेजे (रा. कणेरीवाडी) असे या मुलीचे नाव आहे. या अपघातात तनिष्क नेजे हा ९ वर्षाचा बालक बचावला. काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर Pune-(Bangalore National Highway) पंचायत समितीजवळ हॉटेल अशोका समोर ही दुर्घटना घडली.