पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून निर्दयपणे केलेल्या हत्येविरोधात मुलींचा आक्रोश

girl protest in ichalkaranji today
girl protest in ichalkaranji today
Updated on

इचलकरंजी : नांदेड येथील पाच वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद सोमवारी शहरात उमटले. शहरातील शाळा, महाविद्यालयातील मोठ्या संख्येने मुलींनी आक्रोश मोर्चा काढला. आरोपींना फाशी द्यावी, आम्हाला न्याय द्या या घोषणांनी शहर दुमदुमले. मोर्चात मुलींचा आक्रोश मोठा होता. मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले. 

नांदेडमधील पाच वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार व तिची निर्दयपणे केलेली हत्या या विरोधात शहरातील मोठ्या संख्येने मुली एकत्र आल्या. छत्रपती शिवाजी पुतळा चौकात एकत्र येत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरवात झाली. आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीचे फलक घेऊन मुली मोर्चात सहभागी झाल्या होत्या. जोरदार घोषणा देत या घटनेचा निषेध व्यक्त केला. घोषणांच्या गदारोळात हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. येथे मुलींनी या घटनेविरोधात भावना व्यक्त केल्या. अत्याचार विरोधी मानसिक प्रवृत्तीला मोडीत काढण्याचा निर्धार मुलींनी केला.

आम्हाला न्याय द्या, आरोपींना फाशीची शिक्षा द्या या घोषणा देत हीच मागणी मुलींनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली. मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. खरात यांना देऊन अत्याचाराच्या घटना घडू नयेत या विरोधी शासनाने ठोस पाऊले उचलावीत, अशी ठाम मागणी केली. मोर्चात शहरातील शाळा, महाविद्यालयातील मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 
 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

PhonePe transaction helped solve theft case in Kolhapur
Kolhapur Police System
Rajaram Puri Ganesh Procession
Hasan Mushrif vs Dhananjay Mahadik
Marathi News Esakal
www.esakal.com