गोव्यात पुन्हा भाजपचीच सत्ता येऊ दे ; मुख्यमंत्र्यांनी घातले अंबाबाईला साकडे l CM Pramod Savant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Pramod Savant

गोव्यात पुन्हा BJP ची सत्ता येऊ दे ; मुख्यमंत्र्यांनी घातले अंबाबाईला साकडे

कोल्हापूर : गोव्याच्या (Goa) जनतेचा भाजपवर पूर्ण विश्वास असून पुन्हा भाजपचीच (BJP)सत्ता येईल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Savant) यांनी व्यक्त केला. नववर्षाच्या (New Year 2022) पहिल्या दिवशी काल (ता.१)त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे (Karveer Nivasini Ambabai)दर्शन घेतले. जगावरील कोरोनाचे संकट दूर कर, असे साकडे त्यांनी देवीला घातले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘गोव्यातील जनतेची पुन्हा सेवा करण्याची संधी मिळावी, अशीही प्रार्थना देवीकडे केली. वर्षातून एकदा न चुकता दर्शनासाठी येतो. पण, दोन वर्षे कोरोनामुळे येता आले नव्हते. गोव्याच्या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसचे आव्हान आहे, असे चित्र मुळीच नाही. केवळ पोस्टरबाजीवर कोणच विश्वास ठेवणार नाही. ओमिक्रॉनच्या (Omicron)पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात (Maharashtra)निर्बंध असले तरी गोव्यात अद्यापही असे कोणतेच निर्बंध जाहीर केलेले नाहीत.'‘

दरम्यान, देवस्थान समितीच्या वतीने सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा: KDCC Bank: आम्ही अदानी-अंबानी नाही तर...मुश्रीफांचा सेनेवर घणाघात

नृसिंहवाडीत दत्त दर्शन

नृसिंहवाडी: दत्त मंदिरात श्री चरणांचे दर्शन घेऊन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दत्त दर्शन घेतले. त्यांनी दत्त मंदिरात अभिषेक व आरती करून प्रार्थना केली. यावेळी दत्त देव संस्थानचे वतीने त्यांचा सत्कार झाला.या प्रसंगी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष मेघशाम पुजारी, सचिव महादेव पुजारी, विश्वस्त अशोक पुजारी, अमोल विभूते, संतोष खोंबारे, मुकुंद पुजारी, संजय पुजारी आदी उपस्थित होते.

दख्खनच्या राजाचे दर्शन

जोतिबा डोंगर: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज जोतिबा देवाचे दर्शन घेतले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधीक्षक दीपक म्हेतर यांनी व ग्रामस्थ व पुजाऱ्यांच्या वतीने हेमंत भोरे, हरिदास उपाध्ये यांनी स्वागत केले. दरम्यान, मुख्यमंत्री येणार असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सज्ज होती. जनसुराज्यचे सुमित कदम, तहसीलदार रमेश शेंडगे, शाहूवाडी विभागाचे उपअधीक्षक रवींद्र साळुंखे, सहाय्यक पोलिस निरिक्षक शितलकुमार डोईजड, माजी सभापती विष्णूपंत दादर्णे तसेच भाजपा पन्हाळा तालुक्याचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurGoa
loading image
go to top