नृसिंहवाडी, गौरवाडमधून वाळूची तस्करी

Smuggling Of Sand From Narsinhwadi And Gaurwad Kolhapur Marathi News
Smuggling Of Sand From Narsinhwadi And Gaurwad Kolhapur Marathi News

नृसिंहवाडी : शिरोळ तालुक्‍यातील कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे नृसिंहवाडी, गौरवाड आदी ठिकाणी बेकायदेशीर वाळू तस्करी मोठ्‌या प्रमाणात सुरू झाली आहे. तस्करी रात्री उशिरापर्यंत सुरू असते. याबाबत देवस्थान समितीच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. 

दरवर्षी उन्हाळ्यात शिरोळ तालुक्‍यातील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले की नदीपात्रातील वाळू उघड्‌यावर पडते. आपसूकच वाळूवर तस्कर डल्ला मारतात. दरम्यान येथील दत्त मंदिरासमोरील (औरवाड हद्दीत) पाणवठ्‌यावर रात्री शेकडो वाळू तस्करांकडून मोटारसायकलमधून पोत्यातून वाळू चोरी केली जात आहे. यामुळे दत्त मंदिरासमोरील नदीपात्रात मोठे खड्‌डे पडले आहेत. महाराष्ट्र हरित लवादाच्या निर्णयानुसार व पर्यावरण विभागाच्या सूचनेनुसार चार वर्षपासून महाराष्ट्रात वाळू उपसा बंदी असतानाही येथे बिनदिक्कतपणे शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत वाळू तस्करी केली जात आहे. 

याबाबत दत्त देवस्थानचे अध्यक्ष मेघश्‍याम पुजारी, सचिव महादेव पुजारी यांनी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 

धाडसी कारवाईची गरज 
2012 ते 13 मध्ये तत्कालीन तहसीलदार डॉक्‍टर संपत खिलारी यांनी वाळू तस्करांविरोधात नदीपात्रात बोट बुडवून धाडसी कारवाई केली होती. त्यामुळे वाळू तस्कर काही काळ दहशतीच्या छायेखाली होते. यानंतर गतवर्षी शिरोळच्या तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे धुमाळ यांनीही धाडसी कारवाई केले होती. यामध्ये बोट, ट्रक व वाळू जप्त केली होती. पुन्हा अशा धाडसी कारवाईची गरज ठळक बनली आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com