esakal | ठरलं! गोकुळ अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर; 'या' नावांची जोरात चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

ठरलं! गोकुळ अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर; 'या' नावांची जोरात चर्चा

ठरलं! गोकुळ अध्यक्ष निवडीची तारीख जाहीर; 'या' नावांची जोरात चर्चा

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा (kolhapur district) सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) (gokul election) संघाचे अध्यक्ष (chairman) निवड शुक्रवारी (14) होणार आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांची नावे चर्चेत आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून करवीर तालुका प्रांताधिकारी वैभव नावडकर काम पाहतील. अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व नवोदित संचालकांना निवडीच्या नोटीस (notice send) पाठवण्यात आल्या आहेत.  

गोकुळसाठी चुरशीने झालेल्या निवडणूक (gokul election) आणि धक्कादायक निकाला लागला आहे. आता अध्यक्ष पदाच्या निवडीकडे जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे (maharashtra) लक्ष लागले आहे. गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (vishwas patil) व अरुण डोंगळे (arun dongale) या दोघांची नावे अध्यक्षपदाच्या चर्चेत आहेत. या दोन्ही संचालकांमुळे आणि पालकमंत्री सतेज पाटील, (satej patil) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्या नियोजनामुळे गोकुळच्या राजर्षी शाहू शेतकरी पॅनेलला यश मिळाले आहे.

हेही वाचा: गोकुळ निवडणुकीत भाजपचा भ्रमनिरास : हसन मुश्रीफ

पॅनल प्रमुख सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आव्हाने पूर्ण करण्यासाठी अध्यक्षपदाचा योग्य अनुभव असणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. यासाठी ज्येष्ठ संचालक पाटील व डोंगळे यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. या दोघांपैकी एक अध्यक्ष होणार असा अंदाज वर्तवला जात आहे. 

गोकुळ दूध संघाने वीस लाख लिटर दूध प्रक्रिया प्रकल्प तयार केला आहे. यासाठी जास्तीत जास्त दूध संकलन व्हावे. हेच या नवीन अध्यक्षांना समोर मोठे आव्हान असणार आहे. तसेच दूध उत्पादकांना प्रतिलिटर दोन रुपये जादा दर देण्याचेही आव्हान पेलावे लागणार आहे. आव्हान कोण पेलणार हे आता 14 मे लाच समजणार आहे.

loading image