esakal | गोकुळ निवडणुकीत भाजपचा भ्रमनिरास : हसन मुश्रीफ
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ निवडणुकीत भाजपचा भ्रमनिरास : हसन मुश्रीफ

गोकुळ निवडणुकीत भाजपचा भ्रमनिरास : हसन मुश्रीफ

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा (kolhapur district) सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) (gokul election) संघामध्ये नियती आमच्यासोबत होती. भारतीय जनता पक्षाने (BJP) सत्तारूढ संचालकांना एकतर्फी पाठिंबा दिला होता. पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) आणि माझा सपाटून पराभव व्हावा, यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते. मात्र, यावेळी त्यांचा भ्रमनिरास झाल्याचा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी आज लगावला.

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये (dypatil hospital) आज गोकुळच्या नवोदित संचालकांचा सत्कार पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, (ruturaj patil) आमदार जयवंतराव आसगावकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के.पी.पाटील यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी ते बोलत होते. 

हेही वाचा: बोहल्यावरून नवरा डायरेक्ट गृह विलगीकरणात; पॉझिटिव्ह लपवणे पडले 50 हजाराला

मुश्रीफ म्हणाले, निवडणूकीवेळी दिलेल्या आश्‍वासनानुसार गोकूळचा कारभार केला जाईल. यासाठी एक-दोन महिने अभ्यास करावा लागले. दूध उत्पादकांना प्रतिलिटर दूधाला 2 रुपये जास्त देण्यासाठी नियोजन केले जाईल. दरम्यान, गोकुळमध्ये आपली सत्ता येवू नये. सतेज पाटील आणि माझा पराभव व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टीसह अनेकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. सर्व सभादांना आमच्यावर विश्‍वास टाकला आहे. तीस वर्षांची सत्ता उलथवून आमच्याकडे दिली आहे. आम्ही या निवडणूकीत सकारात्मक प्रचार केला.

स्वच्छ आणि पारदर्शी कारभार केले जाईल. ही बाब दूध उत्पादकांना पटली आहे. यावेळी, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदिप नरके, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर उपस्थित होत्या.

हेही वाचा: जर्मनीचं कोरोनाविरोधी लढाईचं सूत्र; 'सेव्हन डे इन्सिडन्स'

loading image