

Four government-appointed directors get voting right in chairman election
Sakal
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघ 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. राज्य सरकारने 'गोकुळ'वर नियुक्त केलेल्या चार शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावर मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंड पिठाने शिक्कामोर्तब केले आहे. न्यायालयाने या चारही नामनिर्देशित संचालकांना मंगळवारी (१० नोव्हेंबर) होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा कायदेशीर अधिकार बहाल केला आहे. या निर्णयामुळे सतेज पाटील गटाकडे असलेले स्पष्ट बहुमत अचानक धोक्यात आले असून महायुतीचे पारडे अचानक जड झाले.