
सुनील पाटील
जिल्ह्यात शेतीपूरक म्हणून दुग्ध व्यवसाय भरभराटीला येत आहे. दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी आणि आधार मिळत आहे. पाण्यामुळे समृद्ध असणाऱ्या जिल्ह्यात ऊस हे प्रमुख पीक म्हणून पाहिले जाते. मात्र, दुग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले. सध्या, दुधासह दूध पावडर, पांढरे लोणी, तूप, एनर्जी दूध, लस्सी, मसाला दुधाला मोठी मागणी असल्याने चांगला दरही मिळत आहे. याचा उत्पादकांनाही फायदा होणार आहे. जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाच्या अर्थकारणाची माहिती देणारी वृत्तमालिका आजपासून...