esakal | ‘गोकुळ’मध्ये रस्सीखेच; सतेज पाटील, मुश्रीफांसमोर पेच
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोकुळ’मध्ये रस्सीखेच; सतेज पाटील, मुश्रीफांसमोर पेच

‘गोकुळ’मध्ये रस्सीखेच; सतेज पाटील, मुश्रीफांसमोर पेच

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीत (Gokul Election)पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पॅनेलने २१ पैकी १७ जागा जिंकत सत्ता काबीज केली. पॅनेलमध्ये अनेक दिग्गज नेते आल्याने उमेदवारी देण्यावर मर्यादा आल्या. त्यातूनच काहींना स्वीकृत संचालक करण्याचा शब्द देण्यात आला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीकडून(Congress and NCP) प्रत्येकी एक तर शासनाकडून एका संचालकाची नियुक्‍ती होणार आहे. मात्र आगामी काळात नगरपरिषद व विधान परिषद निवडणूक होणार असल्याने तूर्तास स्वीकृत संचालक(Director post Selection) निवडीची शक्‍यता दिसत नाही.

Gokul Director post Selection update marathi news

गोकुळची निवडणुकीत जिल्ह्यातील बहुतांश नेते एका बाजूला तर सत्ताधारी दुसऱ्या बाजूला अशी स्थिती होती. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, (Rural Development Minister Hassan Mushrif),राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,(Minister of State Rajendra Patil-Yadravkar) आमदार विनय कोरे (MLA Vinay Kore)यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडीत एकेक नेते सहभागी झाले; मात्र नेते जास्त व जागा कमी अशी स्थिती होती. त्यातूनच रुसवे, फुगवे, फाटाफूट असे प्रकार होऊ लागले. विरोधी आघाडीच्या पॅनेलमध्ये संधी न मिळणाऱ्या अनेकांना स्वीकृत संचालक पदाचे गाजर दाखवण्यात आले. त्यामुळे काही बंडखोरांचे बंड थंड झाले. काहींना विविध निवडींचे ‘लॉलीपॉप’ दाखवण्यात आले. त्यामुळे पालकमंत्री पाटील (Guardian Minister Satej Patil) स्वीकृत संचालक पदासाठी कोणाचे नाव देणार व का देणार, याची चर्चा होऊ लागली आहे.

हेही वाचा- VIDEO: पाच वेळा आंघोळ मगच घरात प्रवेश; स्मशानभूमीतील कोविड योद्ध्यांची कहाणी

पालकमंत्र्यांचे शिरोळ येथील समर्थक व संघाचे माजी चेअरमन दिलीप पाटील यांचे नाव पुढे येत आहे. पाटील यांना उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. मात्र शिरोळ तालुक्‍यातील दोन नेत्यांनीच त्यांची उमेदवारी कापल्याने त्यांना थांबावे लागले. त्यामुळे स्वीकृत पदासाठी ते प्रबळ दावेदार आहेत. निवडणुकीत पराभूत झालेले विद्याधर गुरबे तसेच उचगाव येथील पाटील समर्थक मधू चव्हाण यांचे नावही चर्चेत आहे. शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र यांचा पराभव झाला. आगामी निवडणुकीचा विचार करून त्यांनाही संधी मिळण्याची शक्‍यता आहे. पुढील काळात चंदगड मतदारसंघावर वचक ठेवण्याचे धोरण राबवले तर तेथून गोपाळराव पाटील यांचे नावही पुढे येऊ शकते.

कोल्हापूरच्या अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडून कागल विधानसभा मतदारसंघातील त्यांचे विश्‍वासू वसंत धुरे यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. धुरे यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने त्यांची संधी हुकली. मुश्रीफ यांचे विश्‍वासू भय्या माने यांनाही स्वीकृत संचालक म्हणून संधी मिळू शकते. सध्या चंदगड मतदारसंघातील एकही संचालक नाही. राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सुश्‍मिता पाटील व याच मतदारसंघातील महाबळेश्‍वर चौगले यांचा पराभव झाल्याने येथील प्रतिनिधीत्व हुकले आहे. त्या तालुक्‍यात ठरावधारकांची संख्या लक्षणीय आहे; मात्र संधी कोणाला द्यायची, असा प्रश्‍न आहे मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर आहे. मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक सतीश पाटील यांची उमेदवारी अंतिम मानली जात होती; मात्र आमदार राजेश पाटील यांनी आग्रह धरल्याने सतीश पाटील यांची उमेदवारी कापण्यात आली. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका राजेश पाटील गटाला बसला, अशीही चर्चा होत आहे. स्वीकृत संचालक पदासाठी सतीश पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. परिणामी तेढ लवकर सुटणार नाही, असेच सध्याचे चित्र आहे.

नगरपरिषद, विधान परिषदेनंतर निवड

आगामी काळात जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका आहेत. यानंतर विधान परिषदेची निवडणूक आहे. विधान परिषद निवडणूक पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी निर्णायक आहे. त्यामुळे गोकुळ स्वीकृत संचालक निवडीसाठी घाईगडबड होण्याची शक्‍यता अजिबात नाही. कोणता गट कसा काम करणार, विधान परिषदेला त्याचा काय फायदा होणार, हे पाहूनच स्वीकृत संचालकांची निवड होईल, अशी शक्‍यता आहे. शासनाकडून एका संचालकाची निवड होण्याची शक्‍यता असून या ठिकाणी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गटाला संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

तूर्त उपाध्यक्षपद नाहीच

संघात उपाध्यक्षपद निर्माण करण्याचे संकेत आहेत. पहिल्यांदा संचालक मंडळात ठराव करून त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागते. तो प्रस्ताव सहकार निबंधकांकडे पाठवावा लागतो. त्यांच्या मंजुरीनंतर उपाध्यक्षपद तयार होईल. ही प्रक्रिया दीर्घ आहे. पहिल्या बैठकीत अध्यक्षांचीच निवड आहे; पण भविष्यात उपाध्यक्षपदाचेही संकेत आहेत.

Gokul Director post Selection update marathi news

loading image