कोल्हापूर : गोकुळ अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) यांनी पुकारलेल्या बंडाला संघाच्या २१ पैकी १९ संचालकांनी सुरुंग लावला आहे. या संचालकांनी राज्यातील राजकारण वेगळे आणि जिल्ह्याचे राजकारण वेगळे हे एकजुटीतून दाखवून दिले आहे. गोकुळच्या (Gokul Dudh Sangh) आजच्या बैठकीत डोंगळे यांच्यासोबत एकही संचालक नसल्याने लवकरच त्यांचे बंड मोडून पडणार असल्याचे चित्र आहे.