
Gokul Dudh Politics Kolhapur : ‘गोकुळच्या दूध संकलनात गडहिंग्लज तालुक्याच्या म्हैस दुधाचे सर्वच नेते कौतुक करतात. पण, हे कौतुक आता पुरे झाले. दुर्दैवाने स्थानिक पातळीवरील उमेदवारांना निवडणुकीत यश मिळाले नाही. पण, तुम्ही स्वीकृत म्हणून गडहिंग्लजला का प्रतिनिधित्व दिले नाही, असा प्रश्न सभासदाने विचारताच काहीसा गोंधळ उडाला. येथील दूध उत्पादकांच्या प्रश्नाला वाली कोण? असा पाठोपाठ प्रश्न येताच सर्वच संचालक निरुत्तर झाले. याबाबतचा निर्णय नेते घेत असून, आपण केवळ अंमलबजावणी करत असल्याचे सांगत माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सारवासारव केली.