कोल्हापूर : ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) यांनी स्थानिक नेत्यांना धक्का देत आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीत राजीनामा देणार नाही, यावर शिक्कामोर्तब केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काल सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथून पुढे ‘गोकुळ’मध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असे राजकारण दिसणार आहे.