Gokul Election : 'गोकुळ'चे अध्यक्ष अरुण डोंगळे स्वतःहून दोन दिवसांत राजीनामा देतील; काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांना विश्वास
Gokul Dudh Sangh President Election : ‘‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाबाबत लक्ष घालतील, असे वाटत नाही. हे जिल्हा पातळीवरील राजकारण आहे. सहकारात पक्षीय राजकारण नसावे, ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे.’’
कोल्हापूर : येत्या दोन-तीन दिवसांत गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) स्वतःहून अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, असा विश्वास काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज विमानतळावर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.