esakal | दूध उत्पादकांना Good News : गोकुळ दूध संघाच्या खरेदी दरात मोठी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Gokul

Good News : गोकुळ दूध संघाच्या खरेदी दरात मोठी वाढ

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्हापूर: गोकुळ दूध (Gokul Dudh Sangh)संघाच्या खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. दुध उत्पादकांना आता म्हशीच्या दुधाला 2 रुपये तर गायीच्या दुधाला 1 रुपयांची वाढ मिळणार आहे. तसेच दुधाच्या विक्री दरात देखील प्रती लिटर 2 रुपये वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. ही दरवाढ 11 जुलै पासून लागू होणार आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. दुधी विक्रीत झालेली दर वाढ मात्र कोल्हापूर, सांगली व कोकण वगळून करण्यात आली आहे.

gokul-dudh-sangh-purchase-price-milk-producers-of-increased-kolhapur-news

दरम्यान, कोल्हापूर वगळता इतर ठिकाणी दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सध्या सत्तेवर असलेल्या नेतेमंडळींनी दूध उत्पादकांना दरवाढ देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे उत्पादकांना दूध दरवाढ देण्याचा निर्णय सध्याच्या सत्ताधारी गटाने घेतला. दूध विक्रीच्या दरात वाढ करीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना ही दोन रुपयाची वाढ देऊन सत्ताधारी गटाने उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. सत्तेवर आल्यानंतर गोकुळ दूध संघाच्या कार्यपद्धतीत मोठा फेरबदल करू असे दिलेले आश्वासने पूर्ण होऊ लागली आहेत.

हेही वाचा- 'आता बस्स! सोमवारी दुकाने उघडण्यास परवानगी नाही मिळाली तर रस्त्यावर उतरु'

दरम्यान, दूध दरवाढीचा फटका कोल्हापूरला बसणार नाही. व्यवस्थापनाने कोल्हापूर वगळता इतर ठिकाणी दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली आली आहे.

loading image