esakal | 'आता बस्स! सोमवारी दुकाने उघडण्यास परवानगी नाही मिळाली तर रस्त्यावर उतरु'
sakal

बोलून बातमी शोधा

'आता बस्स! सोमवारी दुकाने उघडण्यास परवानगी नाही मिळाली तर रस्त्यावर उतरु'

'आता बस्स! सोमवारी दुकाने उघडण्यास परवानगी नाही मिळाली तर रस्त्यावर उतरु'

sakal_logo
By
ऋषिकेश राऊत

इचलकरंजी : व्यापाऱ्यांच्या जिवाशी खेळ शासनाने थांबवावा. आता सहनशीलता संपली आहे. कायदेशीर मार्गाने शासनाने परवानगी द्यावी. सोमवारी (monday) व्यापाऱ्यांनी दुकाने उघडवीत. परवानगी नाही मिळाली तर रस्त्यावर उतरण्याचा जाहीर इशारा माजी खासदार राजू शेट्टी (raju shetti) यांनी दिला. आज शहरात मात्र दुकाने उघडण्यावरून वातावरण चांगलेच तापले होते. तब्बल सहा बैठकांनंतरही शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही.

अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यवसाय नियमित सुरू करण्यासाठी आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (rajendra patil-yadravakar) यांनी शुक्रवारी परवानगी दिली होती. मात्र आज सकाळीच पोलिस (police) प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला. त्वरित माजी खासदार राजू शेट्टी यांनी मालाबादे चौकात मंत्री पाटील यांचा धिक्कार केला. मंत्री पाटील यांनी स्टंट बाजी करत व्यापाऱ्यांशी खेळ थांबवावा, असा सल्लाही दिला. (ichalkaranji)

हेही वाचा: सारथीबाबतच्या मागण्या सरकारने लवकर पूर्ण कराव्यात : संभाजीराजे

तीन महिन्यांच्यावर छोटे मोठे व्यवसाय बंद आहेत. आतापर्यंत शहरातील व्यापारी संघटनेच्या पोलिस प्रशासनासोबत पाच बैठका झाल्या आहेत. परंतु अजूनही त्यात तोडगा निघाला नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी दुकाने सुरू करणार असा इशारा दिला होता. दरम्यान, मंत्री यड्रावकर यांनी शुक्रवारी दुकाने सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करताच पोलिस प्रशासनाने बंद करण्याचा इशारा दिला. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आवाडे व व्यापारी प्रतिनिधी, पोलिस व प्रशासनाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बंद खोलीत चर्चा झाली.

बैठकीत कोणताही दुकाने उघडण्याबाबत लेखी आदेश नसल्याने परवानगी देणार नसल्याचे पोलिस व प्रशासनाने सांगितले. बैठकीनंतर माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यापाऱ्यांना संबोधित केले. आता सहनशीलता न दाखवता सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शासनाने परवानगी दिली नाही तर दुकाने उघडून रस्त्यावर आंदोलन आंदोलन निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: नरेंद्र मोदी यांची कामराज योजना

loading image