Gokul Dudh Sangh : म्हैस, गाय दूध दराबाबत 'गोकुळ'नं घेतला महत्त्वाचा निर्णय; 'इतक्या' रुपयांनी दरात केली वाढ

गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केली आहे.
Gokul Dudh Sangh Buffalo Milk
Gokul Dudh Sangh Buffalo Milkesakal
Summary

दूध खरेदी दरात मात्र प्रती लिटर दोन रुपये केल्याने उत्पादकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (Gokul Dudh Sangh) म्हैस दूध (Buffalo Milk) खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपया वाढ, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केली आहे. संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.

आजपासून (ता. १) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ‘गोकुळ’शी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने दरवाढ केली असून, यामुळे म्हैस दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.

Gokul Dudh Sangh Buffalo Milk
Kolhapur Politics : 'महाडिक धुमधडाका अन् एकच साहेब बंटी साहेब’ घोषणेमुळं सभेत गोंधळ; विरोधकांकडून ठरावाची होळी

अलीकडे गाय दूध संकलनाचे प्रमाण वाढले असतानाच त्या दूध खरेदी दरात मात्र प्रती लिटर दोन रुपये केल्याने उत्पादकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नव्या निर्णयानुसार, म्हशीच्या ५.५ फॅट ते ६.४ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या दुधास प्रतिलिटर एक रुपयाने वाढ केली आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर दीड रुपये वाढ केली आहे.

Gokul Dudh Sangh Buffalo Milk
Konkan Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ खवळलं! केरळ, गोव्यासह राज्याच्या किनारी भागात जोरदार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

आजपासून (ता.१) दूधपुरवठा करणाऱ्या जिल्हा व जिल्ह्याबाहेरील दूध उत्पादकांच्या गाय दूध खरेदी दरामध्ये २ रुपये कपात केलेले आहे. महाराष्ट्रमध्ये खासगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर कमी झाले आहेत. बाजारपेठेतील दूध पूड, लोणी यांचे दर कमी झाले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून गाय दूध खरेदी दर कमी करण्यात येत असल्याची माहिती डोंगळे यांनी दिली.

Gokul Dudh Sangh Buffalo Milk
वाघनखांवरुन राजकारण तापलं! 'आदित्य ठाकरेंना स्वतःची नखं, वाघनखं वाटत असतील'; मंडलिक, मुश्रीफांचा निशाणा

नवे दर असे (कंसात जुने दर रुपयात)

  • म्हैस दूध - ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिलिटर ५०. ५० रुपये (४९.५०)

  • ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ करिता प्रतिलिटर ५२.८० (५१.३०)

  • गाय दुधामध्‍ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करिता प्रतिलिटर- ३३ (३५)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com