

Gokul Milk Union Election satej patil hasan mushrif
esakal
Gokul Election Campaign : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतील राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर दोन्ही आघाड्यांचे उमेदवार निश्चित झाले असून, आज चिन्हवाटपाची प्रक्रिया पार पडली. महायुतीच्या राजर्षी शाहू आघाडीला ‘कपबशी’, तर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी शाहू आघाडीला ‘शिट्टी’ हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आता मतदारांपर्यंत आपले चिन्ह आणि उमेदवारांची माहिती पोहोचविण्यासाठी दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी प्रचाराची धावपळ सुरू केली आहे.