esakal | 'गोकुळमध्ये सत्तांतर'; महाडीकांच्या गोकुळात पाटील, मुश्रीफ जोडगोळीचा ऐतिहासिक विजय

बोलून बातमी शोधा

'गोकुळमध्ये सत्तांतर';  महाडीकांच्या गोकुळात पाटील, मुश्रीफ जोडगोळीचा ऐतिहासिक विजय
'गोकुळमध्ये सत्तांतर'; महाडीकांच्या गोकुळात पाटील, मुश्रीफ जोडगोळीचा ऐतिहासिक विजय
sakal_logo
By
सुनील पाटील, संदीप खांडेकर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) (Gokul Election Kolhapur)निवडणुकीत विरोधी गटाने सत्ताधारी गटाला हादरा देत तब्बल सतरा जागांवर विजय मिळविला. सत्ताधारी गटाचे केवळ चार उमेदवार विजयी झाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने इतिहास रचत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गोकुळमधील सत्तेला सुरूंग लावला.

Gokul election final result update Guardian Minister Satej Patil v. Former MLA Mahadevrao Mahadik Kolhapur Gokul Doodh Sangh Election

राजर्षी शाहू शेतकरी आघाडी - विरोधी गट - सर्वसाधारण गट - अरूण डोंगळे - 1980, अभिजित तायशेटे - 1972, अजित नरके - 1972, नविद मुश्रीफ - 1959, शशिकांत पाटील-चुयेकर - 1923, विश्‍वास पाटील - 1912, किसन चौगले - 1889, रणजित कृष्णराव पाटील - 1872, नंदकुमार ढेंगे - 1867, कर्णसिंह गायकवाड - 1848, बाबासाहेब चौगले - 1814, प्रकाश पाटील - 1709, संभाजी पाटील - 1721, महिला गट - अंजना रेडेकर - 1872, भटक्‍या विमुक्त जाती-जमाती - बयाजी शेळके, इतर मागासवर्गीय - अमर पाटील, अनुसुचित जाती- डॉ. सुजित मिणचेकर. राजर्षी शाहू आघाडी - सत्ताधारी गट -अंबरिशसिंह घाटगे - 1803, बाळासाहेब खाडे - 1715, चेतन नरके - 1762, शौमिका महाडिक - 1769.

हेही वाचा- सहाव्या फेरीतही विरोधकांची निर्णायक आघाडी

Gokul election final result update Guardian Minister Satej Patil v. Former MLA Mahadevrao Mahadik Kolhapur Gokul Doodh Sangh Election

Edited By- Archana Banage