Gokul election
esakal
कोल्हापूर, : गोकुळसाठी ३०० पैकी २४० उमेदवारी अर्ज आज वैध ठरले. याची यादी रमणमळ्यातील निवडणूक कार्यालयाच्या बाहेर प्रसिद्ध केली. एकूण ६० इच्छुक उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यांना त्यांचे आदेश वैयक्तिक पाठवले आहेत. माजी संचालकांचा एक अर्ज अवैध ठरला असला, तरीही त्यांचा दुबार अर्ज वैध ठरला आहे. सर्वसाधारण गटात सर्वाधिक उमेदवार असून, त्यामध्ये बहुतांशी माजी संचालकांचा समावेश आहे.