

Gokul Milk Union Election Vote Counting
esakal
Kolhapur Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान एका मतपेटीत सापडलेल्या चिठ्ठीची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीत ठरावधारकांना शपथा घालण्याच्या प्रकारावर एका मतदाराने चिठ्ठीतून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?” असा थेट सवाल या चिठ्ठीतून नेत्यांना करण्यात आला आहे.