

Gokul Milk Union Election Satej Patil Hasan Mushrif Result 2026
esakal
Gokul Election Result 2026 : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे मतमोजणीत प्रचंड मतांनी पिछाडीवर पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महायुतीचे अरुण डोंगळे यांच्यासह अमर पाटील यांनाही पिछाडीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या सहा उमेदवारांनी आघाडी घेतल्याने महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. अरुण डोंगळे यांच्या पिछाडीमुळे आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याबाबत व्यक्त केलेल्या नाराजीचा मतपेटीतून परिणाम दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.