Gokul Election Result 2026
esakal
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. १९) जाहीर झाला. या निवडणुकीत सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने १३ जागांवर विजय मिळवला, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालानंतर सतेज पाटील यांनी दूध उत्पादक आणि ठरावधारकांचे आभार मानत महायुतीवर निशाणा साधला.