esakal | 'गोकुळ निवडणुकीमुळे कोरोना वाढणार नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

'गोकुळ निवडणुकीमुळे कोरोना वाढणार नाही'

'गोकुळ निवडणुकीमुळे कोरोना वाढणार नाही'

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणूकीमुळे कोरोना रुग्ण वाढणार नाहीत. संघाच्या निवडणूकीसाठी कोठेही सभा होणार नाही किंवा सामुहिक भेटी-गाठी होणार नाहीत. कारण प्रत्येक ठरावदारासोबत विचारांची भांडवली गुंतवणूक झालेली आहे. त्यामुळे, फारसा प्रचार करावा लागणार नाही. जिल्हा बॅंकेच्या कर्मऱ्याचा संबंध गोकुळ निवडणूकीशी जोडल्यामुळे मी बोललो नाहीतर मला पालकमंत्री सतेज पाटील व माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या वादात पडलो नसतो, असा खुलासा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केला. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या श्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना पराभव समोर दिसत असल्यामुळे गोकुळची निवडणूक पुढे ढकला, रद्द करा अशी मागणी केली जात आहे. गोकुळ ठरावदाराचा मृत्यू म्हणून पत्रक पाहिले. वास्तविक ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला ते गोकुळचे ठरावदार व जिल्हा बॅंकेचे कर्मचारी आहेत. वास्तविक माजी खासदार धनंजय महाडिक यांनी निवडणूक पुढे ढकला म्हणून केलेली मागणी चुकीची आहे. ज्या ठरावदारा आणि बॅंकेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यांचा बॅंकेत दररोज हजारो लोकांसोबत संपर्क येतो. त्याचा संबंध गोकुळशी जोडणे चुकीचे आहे. बॅंकेच्या ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्याचा दुदैवाने मृत्यू झाला त्यांना 21 लाख रुपये व अनुकंपाखाली एका व्यक्तिला जिल्हा बॅंकेत नोकरी दिली जाणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

तर या निवडणूकाही थांबल्या असत्या

निवडणूकीला सर्वोच्च न्यायालयात काही तरी कारण मिळावे म्हणून गेले असले तरी ते यशस्वी होणार नाहीत. असे असेल तर पश्‍चिम बंगालच्या निवडणूकाही थांबवाव्या लागतील. तसेच, नुकतीच विधानसभेच्या पंढरपूर मतदार संघाची निवडणूक झाली. बेळगाव विधानसभेचही निवडणूक झाली. या निवडणूकाही थांबवल्या पाहिजे होत्या. पण केवळ पराभव समोर दिसत असल्यामुळे गोकुळ सत्तारूढ निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत.

माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या निकटचे सहकारी व बॅंकेचे विभाग प्रमुख पांडुरंग शिंडगे यांचाही गेल्यावर्षी दुदैवी मृत्यू झाला होता. त्यांना बॅंक नियमानूसार लाभ दिला आहे. पण, बॅंकेत हजारो लोक येतात. त्यांचा संपर्क येतो. यात गोकुळ ठरावदारांचा काहीही संबंध नसतो. हा विचारही माजी खासदार धनंजय महाडिक यांनी करायला हवा होता, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

गोकुळ निवडणूकी हा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हट्टाहास म्हणने चुकीचे आहे. त्याचा काहीही प्रश्‍न नाही. जे कोरोनामुळे मयत झाले ते जिल्हा बॅंकेचे कर्मचारी आहेत. यापूर्वीही बॅंकेचे काही कर्मचाऱ्यांचा दुदैवी मृत्यू झाला त्यावेळी काही गोकुळची निवडणूक नव्हती किंवा ते मयत झालेले गोकुळचे ठरावदार ही नव्हते, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.