esakal | गोकुळ रणांगण; महाडीक-समरजितसिंह घाटगे यांच्यात चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ रणांगण; महाडीक-समरजितसिंह घाटगे यांच्यात चर्चा

गोकुळ रणांगण; महाडीक-समरजितसिंह घाटगे यांच्यात चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी आज शाहू-कागल' व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची त्यांच्या नागाळा पार्क येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. 'गोकुळ' च्या निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन या भेटीत महाडीक यांनी केले.

'गोकुळ' च्या निवडणुकीत भाजपाने सत्तारूढ गटाला पाठिंबा दिल्याची घोषणा यापुर्वीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या निवडणुकीत जागा वाटपाबाबत सत्तारूढ गटाशी चर्चा करण्याचे सर्वाधिकार घाटगे यांना दिले आहेत. या पार्श्‍वभुमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. अलिकडेच समरजितसिंह घाटगे गटाचा मेळावा कागलमध्ये झाला, त्यात या गटाला एक-दोन जागा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली. या निवडणुकीत भाजपाकडे सुमारे 250 ठरावधारक असल्याचा दावा करण्यात येत आहे. या जोरावर एक तरी जागा भाजपाला मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातील सर्वाधिक श्री. घाटगे यांना दिल्याने श्री. महाडीक यांनी त्यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

महाडीक यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडीक याही या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सौ. महाडीक ह्या श्री. घाटगे यांच्या नात्याने चूलत बहिण लागतात. या निवडणुकीच्या निमित्ताने पै-पाहुण्यांची साथ मिळावी हाही या भेटीमागचा उद्देश आहे.