esakal | Gokul Election: आराम गाडीतून मतदारांचे 'ऐटित' मतदान; राधानगरीत मुश्रीफ, मंडलिकांना जबरदस्त प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

Gokul Election: आराम गाडीतून मतदारांचे 'ऐटित' मतदान; राधानगरीत मुश्रीफ, मंडलिकांना जबरदस्त प्रतिसाद

Gokul Election: आराम गाडीतून मतदारांचे 'ऐटित' मतदान; राधानगरीत मुश्रीफ, मंडलिकांना जबरदस्त प्रतिसाद

sakal_logo
By
राजू पाटील : सकाळ वृत्तसेवा

राधानगरी (कोल्हापूर) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज राधानगरी तालुक्यात अत्यंत चुरशीने झाले. दोन्ही कडून शक्तिप्रदर्शनाचा आटोकाट प्रयत्न झाला, मात्र यावेळी विरोधी आघाडीकडून पिवळ्या टोप्या घालून झालेले शक्तिप्रदर्शन लक्षवेधी ठरले.

दुपारपर्यंत 451 मतदारांनी मतदान केले होते. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींकडून दुपारनंतर मतदान नोंदवले. आज सकाळपासून राधानगरी येथील राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालय व राधाबाई कन्या विद्यालय या दोन ठिकाणी आठ केंद्रांवर मतदान सुरू झाले.

सकाळी साडेदहाच्या सुमारास सत्ताधारी आघाडीचे लोक पांढऱ्या टोप्या घालून मतदानासाठी हजर झाले. त्याचे नेतृत्व येथील उमेदवार राजाराम भटळे' पी. डी. धुंदरे व रविष पाटील यांनी केले. अत्यंत सुरळीत व शांततेत मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर विरोधी आघाडीच्या मतदारांना शक्तिप्रदर्शनाने येथील उमेदवार अभिजीत तायशेटे, अरुण डोंगळे, किसन चौगुले यांनी आणले. हा ताफा लक्षवेधी होता. मतदानासाठी तब्बल 361 लोक आणल्याचा दावा उमेदवारांनी केला. दुपारी बारा वाजता यांचे आगमन झाले. त्यानंतर मतदानाला गती आली.

कोरोनाच्या धर्तीवर अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत मतदान नोंदले जात होते. यासाठी तहसीलदार मीना निंबाळकर' पोलीस निरीक्षक उदय डूबल, सहाय्यक निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त व शिस्त लावली होती.

येथील 458 मतदारांपैकी तब्‍बल 361 मतदार आमच्याकडे आहेत ही स्थिति जिल्हाभर असून हा निकाल 21 । 0 असा लागणार असून सत्ताधारी त्यांचा धुव्वा उडेल. असे मत अरुण डोंगळे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा- Gokul Election 2021 Update:राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलात चुरशीने ९९ टक्के मतदान

विरोधी आघाडी चे सर्व मतदार गैबी येथे असलेल्या अभिजीत तायशेटे यांच्या शिक्षण संकुलामध्ये एकत्र केले होते. इथे या आघाडीचे नेते ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांनी मतदारांना उद्देशून प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले व पॅनल टू पॅनल मतदार मतदान करा. असे आवाहन केले. यानंतर सर्व मतदार आराम गाडीतून मतदान केंद्रावर रवाना झाले.

Edited By- Archana Banage

loading image
go to top