

Gokul election politics
sakal
कोल्हापूर : संस्था अवसायानात काढण्याच्या निर्णयाविरोधात सोमवारी झालेल्या ‘गोकुळ’च्या मेळाव्यात सत्ताधारी आणि विरोधी संचालकही एकत्र असताना या संस्थांविरोधात न्यायालयात गेलेल्यांच्या मागची अदृश्य शक्ती कोण? असा प्रश्न ‘गोकुळ’च्या राजकीय क्षेत्राला पडला आहे. अदृश्य शक्तीचा डाव हाणून पाडण्याच्या अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या इशाऱ्याने या चर्चेला उधाण आले आहे.