‘‘गोकुळ’मधील टँकर लॉबी निघणार मोडीत: अधिकारी, कर्मचारी लक्ष्य

‘‘गोकुळ’मधील टँकर लॉबी निघणार मोडीत: अधिकारी, कर्मचारी लक्ष्य

कोल्हापूर : गोकुळच्या (Gokul DUdh Sangh)प्रचारातील मुख्य मुद्दा ठरलेल्या टँकर वाहतूक ठेका, प्रमुख अधिकाऱ्यांसह पुणे व मुंबईतील (Pune, Mumbai)वरिष्ठ अधिकारी यांच्यावर पहिली कारवाई होणार, असे संदेश सोशल मीडियातून(social media) फिरू लागले आहेत.

Gokul Milk Tanker lobby in gokul viral post on social media gokul dudh sangh kolhapur update

निवडणुकीत विरोधी गटाने टँकरचा (Gokul Milk Tanker lobby) मुद्दा उचलून धरला. सध्या दूध वाहतुकीसाठी १५० टँकर आहेत. या टँकरचा दूध वाहतूक करार चार-पाच महिन्यांत संपत आहे. त्यानंतर यातील किमान १३० टँकर बंद होणार असल्याचे सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे. संचालकांच्या मर्जीतील व एकाच ठिकाणी तळ ठोकलेल्या व संघाच्या कामापेक्षा राजकारणात रस असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. या कर्मचाऱ्यांसह कार्यकारी संचालकांपासून पुणे व मुंबईतील अधिकारी हिट लिस्टवर असल्याचेही यात म्हटले आहे.

टँकर, स्थानिक दूध वाहतुकीचे टेंपो, दूध वितरणाची एजन्सी आदींत मोठा घोटाळा आहे. गेली पाच वर्षे विरोधी आघाडीचे नेते हे मुद्दे घेऊनच सभासदांच्या दारात गेले. दूध संघातील केवळ टँकरचे टेंडर बदलले, तर लिटरला एक रुपया जादा दर देणे सहजशक्य होईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केले होते, त्यानुसार कारवाईची मागणी केली आहे.

सत्तांतरानंतर अंतर्गत हालचाली पाहता नेते व संचालकांच्या टँकरवर पहिला हातोडा टाकला जाणार आहे. संघात नेत्यांसह संचालक व त्यांच्या नातेवाइकांचे १५० टँकर आहेत. आता सत्तेत आलेल्या आघाडीतील तीन संचालकांचे सुमारे २० टँकर आहेत. दूध वाहतुकीचा टँकर मालकाशी पाच वर्षांचा करार आहे. त्याची मुदत २०२१ मध्ये संपत आहे. त्यामुळे चार-पाच महिन्यात टँकरचे ठेके बदलले जाणार, असा विश्वासही व्यक्त केला आहे. टँकरशिवाय अधिकारी आणि कारभारी कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी आहे. सर्वसाधारण सभेला कार्यकारी संचालकांना हटवा, निवृत्त अधिकाऱ्यांचे काम काय, अशी विचारणा विरोधकांनी केली होती.

फार्म हाऊस, घरातील कर्मचारी गोकुळात

गोकुळमध्ये अनेक वर्षे काही संचालक संघाचा सर्वतोपरी फायदा घेत आहेत. काही संचालकांच्या फार्म हाऊस व घरात गोकुळचे कर्मचारी काम करत आहेत. काम संचालकाचे आणि पगार दूध संघाचा, अशी परिस्थिती आहे. अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा गोकुळात यावे लागणार आहे.

Gokul Milk Tanker lobby in gokul viral post on social media gokul dudh sangh kolhapur update

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com