Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

Supreme Court Rejects Plea Against 492 Gokul Societies : गोकुळमधील अवसायनातील ४९२ दूध संस्थांना मतदार यादीतून वगळण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
Gokul Milk Union

Gokul Milk Union

esakal

Updated on

कोल्हापूर : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना मतदान यादीतून वगळण्यासाठी दाखल झालेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. यामुळे ४९२ सर्व दूध संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम राहिला. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पी. एस. नरसिंही आणि न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. ‘गोकुळ’वर प्रशासक नियुक्त झाल्यापासून या ना त्या मुद्द्यावरून न्यायालयीन लढाई सुरू झाली. अवसायनातील संस्थांचा मुद्दा यापूर्वी विभागीय उपनिबंधक आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्येही उपस्थित झाला होता. तिथे अवसायनातील संस्थांना मतदानाचा अधिकार दिला. यानंतरही श्रीराम दूध संस्था आणि श्री काडसिद्धेश्वर संस्था यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याची सुनावणी आज झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Election
Gokul Election
Gokul Election Objections and Hearing Controversy
Gokul Milk Union Election
Marathi News Esakal
www.esakal.com